नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झाली आहे. आत्तापर्यंत तुर्कस्थानमधे १७ हजार ६७४ तर सीरियात ३ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
अतिशय थंड वातावरणामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. कहारनमारस इथून २८ हजारांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं तुर्कस्थानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं सांगितलं.
संयुक्त राष्ट्राचं पहिलं मदत पथक बंडखोरांच्या ताब्यातल्या वायव्य सीरियात पोहचलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस देखील सिरियात पोहचले आहेत.