नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या होत असलेली रामनवमी आणि येत्या २५ एप्रिल होत असलेली महावीर जयंती आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासननिर्णयही आज जारी केला गेला.
यानुसार भाविकांना पुजा किंवा दर्शनासाठी मंदिरांमध्ये जायला बंदी असेल. याशिवाय मंदिरांमध्ये कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करायलाही बंदी केली आहे. नागरिकांनी रामनवमीच्या उत्सवानिमीत्त प्रभात फेरी किंवा मिरवणुका काढायला मनाई केली आहे. मंदीर व्यवस्थापकांनी शक्य असल्याचं भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी असे या आदेशात म्हटले आहे.
राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घरच्या घरीच साधेपणानं उत्सव साजरा करावा असे आवाहनही राज्य शासनाने केले आहे.