पिंपरी : प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. दिनांक २५ मे रोजी वॉर्ड क्रमांक २४ मधील वाकडरोड येथे २० दुकानांची तपासणी केली. त्यापैकी चार दुकानदारांकडे ५.५ किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कच-याबाबत एका व्यक्तीवर कारवाई करुन दोनशे रुपयांचा दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे दोन व्यक्तीकडून तीनशे रुपये दंड वसूल करण्यात आला, असे एकूण मिळून २०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही सर्व कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक राजीव बेद, आरोग्य निरिक्षक एस. बी. चन्नाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.