नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात वाढ केली आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी रेमडेसीवीरच्या उपलब्धेविषयी आढावा घेतल्यानंतर, बातमीदारांना ही माहिती दिली.

आता वाढलेल्या कोट्यानुसार २ मे पर्यंत पुढच्या महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या रेमेडिसीवीरच्या मात्रांमधे ३८ हजार ५०० इतकी, वाढ केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला एकूण ४ लाख ७३ हजार ५०० मात्रा मिळतील.

दिल्लीला दिल्या जाणाऱ्या मात्रांमधे ९ हजार ३०० ची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीला एकूण ८१ हजार ३०० मात्रा मिळतील असं त्यांनी सांगितलं. रेमेडिसीवरच्या उत्पादनात प्रयत्नपूर्वक वाढ केली असल्यानं, त्यानुसार हा कोटा वाढवला असल्याचं गौडा यांनी सांगितलं.