मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना, अलौकिक कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. भारतीय चित्रपटसृष्टीला आज लाभलेल्या वैभवामागे चित्रमहर्षी दादासाहेबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी व केलेले परिश्रम आहेत. भारतात चित्रपटनिर्मिती करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी लंडनमध्ये जावून चित्रपटनिर्मितीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक कलात्मक तसेच तांत्रिक बाजू आत्मसात केल्या.
‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेबांसारख्या मराठी माणसानं रचलेल्या पायावर आज भारतीय चित्रपटसृष्टी अनेक दृष्टीनं समृद्ध झाली आहे, दिमाखदार कामगिरी करत आहे, ही बाब अभिमानाची व प्रेरणादायी आहे. चित्रमहर्षी दादासाहेबांना भावपूर्ण आदरांजली.