मुंबई (वृत्तसंस्था) : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशानं आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचं ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ अस नामकरण करण्यात आलं आहे. या संदर्भातयृला शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं काल निर्गमित केला आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं नाव या स्पर्धेला देण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे आयोजन केलं जातं. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे.