पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.

मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आयोजित कल्याणकारी योजनांच्या लाभ वाटप सोहळयामध्ये ते बोलत होते. राज्याचे कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खा. श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, गणेशराव भेगडे, प्रशांत ढोरे, संदीप काकडे, नंदाताई सातकर आदि उपस्थीत होते.

श्री. भेगडे म्हणाले की, कामगारांसाठी  केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये बांधकाम कामगार योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना “सुरक्षा संचाचे” वाटप करण्यात येत असून राहिलेल्या लाभार्थ्यांनाही  लवकरच साहित्य पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.