मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभागात १६ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. अ आणि ब वर्गातले प्रत्येकी दोन हजार, तर क आणि ड वर्गातले एकूण १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यातल्या क आणि ड वर्गाच्या जागा विभागीय पातळीवर तर अ आणि ब वर्गातली पदं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन भरण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री स्तरावर हा निर्णय घेतला जाणार आहे, यासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.नव्या ऑक्सिजन प्लांटचे प्रस्ताव तपासण्याचं काम टास्कफोर्सला दिलं असल्याचं सांगतानाच कर्नाटकातल्या बेळ्ळारी प्रकल्पातून महाराष्ट्राला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणीही टोपे यांनी यावेळी केली.