नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप देशभरात आणि कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या लोकांसाठी होणार आहे.
या औषधांची परिणामकारकता वैद्यकीय चाचण्यांमधून सिद्ध झाली आहे. युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री आणि अतिरिक्त पदभार आयुष मंत्री किरण रिजिजू यांनी आज या उपक्रमाचं उद्घाटन केलं.या कार्यक्रमाला सेवाभारतीचं महत्वाचं सहकार्य मिळालं आहे.