मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४ हजार ५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवले. आतापर्यंत ६ लाख ६४ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३ हजार ३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ६ लाख ७१ हजार ३९४ झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कलावधी १३८ दिवसांवर आला आहे.  सध्या ४९ हजार ४९९ रुग्ण उपचार घेत आहेत. काल ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १३ हजार ६८७ वर पोचला आहे.