मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत एक ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु केली असून शहरातल्या विविध मॉलजवळ ही मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये ४५ वर्ष वयावरच्या व्यक्तींचं त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींचं लसीकरण जागेवरच करण्यात येत आहे. याची सुरुवात नेरुळ आणि वाशी इथल्या मॉलजवळ ५ मेपासून करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या वाहनांमध्ये असलेल्यांना टोकन नंबर देण्यात येऊन त्यांच्या आधार कार्डाची तपासणी केल्यानंतर त्यांना लसीच्या मात्रा देण्यात येत असून आतापर्यंत १४६ जणांना लसीच्या मात्रा देण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरांनी दिली आहे.