नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आजपर्यंत आलेल्या मदतीपैकी नऊ हजार २८४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सात हजाराहून अधिक ऑक्सिजनच्या टाक्या, १९ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पाच हजार ९३३ व्हेंटिलेटर्स, रेमडेसीव्हीर इजेक्शनच्या तीन लाख ४४ हजारांहून अधिक कुप्या देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

येणाऱ्या सर्व वैद्यकीय मदतीचा सुरळीत आणि वेगाने पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.