मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात सर्व ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत समिती ही राज्यातली पहिलीच असल्याची माहिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली.
राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार कणकवली तालुक्यानं विशेष ग्रामसभा घेण्याचं नियोजन केलं होतं. त्यानुसार सर्वात प्रथम कणकवली तालुक्यात हुंबरट या ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत करण्यात आला होता.