नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन झाल्यापासून दोन महिन्यांत भारत आणि जगभरातून ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, सरन्यायाधीश सभापती, संसद तसंच केंद्रीय मंत्री मंडळाचे सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासक आदींनी या संग्रहालयाला भेट दिली आहे.