नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मर्यादेचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. सरकारी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत काल रात्री अकरा वाजेपर्यंत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३२७ होता.
दिल्लीत आनंद विहार मध्ये निर्देशांक ५२७ वर पोहोचला होता. ३०१ ते ४०० दरम्यान असलेल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक अत्यंत खराब हवा असल्याचं निदर्शक आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता घसरते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली होती.