नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विभागांनी लडाखमधे अनेक विकासकामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लडाखमधे रोजगार निर्मित करुन लडाखचं क्षेत्रिय महत्त्व वाढवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करुन, ७० वर्षाचं नकारात्मक वातावरण दूर करण्यात येईल.

केंद्र सरकारनं लडाखच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या असून, येत्या दोन दिवसात लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून समोर येणार असल्याची माहती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली आहे. या ठिकाणी पर्यटन विकासामुळे अर्थव्यवस्थाही बळकट व्हायला मदत होईल.