MALAPPURAM, MAY 14 (UNI) The National Disaster Response Force (NDRF) personnel reached the District quarters,as part of arranging precautionary measures and to evacuate the people from coastal areas, if needed following sea depression due to Cyclone Tauktae in North Kerala, on Friday. UNI PHOTO-1AKU

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह, मुंबई अग्निशमन दल, वीज वितरण कंपन्यांसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीही परत आणल्या आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद ठेवला आहे, तर दहिसर आणि वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रांमधल्या रुग्णांना सुरक्षितरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे.

मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर लाइफ गार्डसह, अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. याशिवाय किनारपट्टी लगतच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज निर्माण झाली तर त्यादृष्टीनं तात्पुरत्या निवाऱ्यांची सज्जताही ठेवली आहे.

या ठिकाणी अन्न, पाण्यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबल सिंग चहल यांनी दिले आहेत.