मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. अकोला जिल्ह्यात पिक विम्या पोटी ७७ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचा विमा काढला होता. विमा कंपनीने शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून १३६ कोटी रुपये जिल्हाभरातून जमा केले होते.