मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कालावधी मासेमारी बंदी कालावधी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यासंदर्भातला आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे. या आदेशानुसार राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु ही बंदी पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू असणार नाही.