नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातील पहिली विनाशिका असलेल्या आय.एन.एस.राजपूतला काल विशाखापट्टण इथं तिच्या ४१ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलं.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीनं पार पाडण्यात आला. सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रध्वज आणि नौदल चिन्ह खाली घेऊन या विनाशिकेला मानवंदना देण्यात आली. यावेळी एका विशेष टपाल तिकिटाच आनावरण करण्यात आलं.

मे १९८० साली आय.एन.एस. राजपूत भारतीय नौदलात दाखल झालं होतं.आपल्या सेवाकाळात या विनाशिकेनं पूर्व आणि पश्चिम या दोन्ही समुद्रात अत्यंत प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे.