नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे नवे रुग्ण आढळण्याचा दर आता ११ पूर्णांक ३४ शतांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. १० मे रोजी हा दर २४ पूर्णांक ८३ शतांश टक्के होता. १४ दिवसात त्यात ५५ टक्के घट झाली आहे.
गेले ७ दिवस सलग नव्या बाधितांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होती. काल ती सर्वात कमी २ लाख ४० हजार इतकी नोंदली गेली. सक्रीय रुग्णांची संख्या ही २८ लाख ५ हजार ३९९ पर्यंत कमी झाली असून ती एकूण बाधितांच्या प्रमाणात १० पूर्णांक ५७ शतांश टक्के आहे.
रुग्णांचा बरे होण्याचा दर ८८ पूर्णांक 3 दशांश टक्के इतका सुधारला आहे. देशभरात काल एका दिवसात विक्रमी २१ कोटी २३ लाख चाचण्या करण्यात आल्या.केंद्रसरकारने प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी सांगते की कोविड प्रतिबंधक लशीच्या २१ कोटी ८० लाख मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आल्या आहेत.
त्यातल्या २० कोटी वापरल्या गेल्या असून अद्याप १ कोटी ८० लाख मात्रा शिल्लक आहेत. येत्या ३ दिवसात आणखी ४८ लाख मात्रांचा पुरवठा करण्यात येईल असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.