नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्युकरमायकोसिस आजार झालेले ५ हजार ४२४ रुग्ण आतापर्यंत देशात नोंदवले गेले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. यातल्या ४ हजार ५५६ रुग्णांना कोविड झाला होता तर ५५ टक्के रुग्णांना मधुमेह होता असं त्यांनी सांगितलं.

देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित मंत्रिगटाच्या बैठकीत आज ते बोलत होते. गेले ११ दिवस दररोज कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संसर्ग झालेल्यांपेक्षा कमी आहे. याचाही उल्लेख त्यांनी केला.

इतर विभागांचे मंत्री, अधिकारी तसंच नीती आयोगाचे सदस्य डॉ. V K पॉल आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव बैठकीला उपस्थित आहेत.