नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली आहे. आधुनिक उपचारपद्धतीविषयी बाबा रामदेव यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय वैद्यक परिषदेने त्यांना नोटीस बजावली होती.

त्यानंतर हे विधान मागे घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही रामदेव यांना पत्राद्वारे केलं होतं. त्याच्या उत्तरात रामदेव यांनी आपण शेरा मागे घेत असून वैद्यकीय उपचारांच्या विविध पद्धतींविषयीचा वाद इथेच संपवत असल्याचे म्हटले आहे.