पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेने या वर्षी चौदा टक्के लाभांश दिला आहे. तसेच सेवानिवृत्त व सलग पंचवीस वर्ष सभासद व्यक्तींना पाच हजार रुपये सर्व बक्षिस अदा केले आहे. त्याचबरोबर सर्व सभासदांना भेटवस्तू देणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. तसेच मनपाप्रमाणे पतसंस्थेतील कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार सेवा उपदान लाभ लागू करण्यात आला आहे.
संस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 27 मे) शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सिमा अनिल सुकाळे या होत्या. या ऑनलाईन वार्षिक सभेमध्ये उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, सचिव मुकुंद वाखारे, खजिनदार महादेव बोत्रे, संचालिका चारुशिला जोशी, संचालक महाद्रंग वाघेरे, संजय कुटे, मनोज माछरे, आबा गोरे, राजाराम चिंचवडे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, रमेश चौरघे, यशवंत देसाई, नंदकुमार घुले आदी उपस्थित होते. सीमा सुकाळे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखविला. सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजूरी दिली.