नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती १० दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सह सचीव विपीन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.