नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणविषयक उपकरणांमधे अभिनव संशोधन करणाऱ्या संरक्षण अभिनवता संस्थेसाठी आगामी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजूर केला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे चालना मिळेल, असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्याच्या उद्देशानं iDEX-DIO ची स्थापना झाली आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे ३०० स्टार्ट अप उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यात येणार असून त्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह काही व्यक्तिगत उद्योजकांचाही समावेश आहे.