नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही मेट्रो सेवा बंद होती. आता केवळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान ही मेट्रो सेवा सुरु राहणार असून, शनिवार रविवारी मात्र अजूनही बंगळूरू मध्ये कडक लॉकडाऊन असल्याने ती बंद राहणार आहे.