नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर मध्ये बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्या झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबा च्या उच्च कमांडर सह तीन अतिरेकी ठार झाले. बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरच्या गुंड ब्राथ भागात लष्कर, जम्मूकाश्मीर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या अतिरेक्यांच्या शोध मोहिमे दरम्यान ही चकमक झाली.