मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची प्रगतीपथावर असलेली बांधकामं पूर्ण करावी, त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. इतर आरोग्य सेवा-सुविधा, प्राणवायू निर्मिती आणि साठवण क्षमता यांचीही त्यांनी माहिती घेतली. दररोज ३ हजार मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने क्षमता वाढवावी असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

योजना आयोगाच्या शिफारशीनुसार आरोग्य सेवांसाठी स्थूल राज्य उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी उपलब्ध करून द्याव्या असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत सांगितले.