नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या धाडसी सुधारणांमुळे उद्योग क्षेत्रात भारताला मोठे स्थान प्राप्त झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित जागतिक गुंतवणूकदार गोलमेज बैठकीत त्यांनी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला. सूक्ष्म उद्योग क्षेत्रातले स्थैर्य, पायाभूत सुधारणांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि वित्त क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे भारत हा आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले.