नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्याच्या वर गेला आहे. काल ५९ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी ९५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक १ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात ४६ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले, तर ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३ हजार १२ वर पोचली आहे. देशभरात सध्या ५ लाख ९ हजार ६३७ ॲक्टिव रुग्ण आहेत.