मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ८ हजार ६३४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ९ हजार १९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २५२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ७० हजार ५९९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५८ लाख २८ हजार ५३५ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख २२ हजार १९७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ लाख १६ हजार ६६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. धुळे जिल्ह्यात काल तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले काल जिल्ह्यात सहा नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा, जिल्ह्यात काल ४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात ६२ नवीन रुग्ण आढळले सध्या ९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ रुग्ण दगावले आहेत. हिंगोली जिल्ह्यात काल बरे झालेल्या पाच रुग्णांना घरी पाठवलं जिल्ह्यात काल चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले सध्या ३८ रुग्ण उपचार घेत आहेत काल या आजारानं एका रुग्णाचा बळी घेतला.सांगली जिल्ह्यात काल ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात ९४४ बाधित रुग्ण आढळले. सध्या ९ हजार ६३४ रुग्ण उपचार आधीन आहेत काल १६ रुग्णांनी आपले प्राण गमावले. नांदेड जिल्ह्यात काल २० रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली काल जिल्ह्यात सात रुग्णांना या आजाराची लागण झाली. सध्या ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी जिल्ह्यात काल १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल २० नवीन रुग्णांची भर पडली. सध्या २८७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.