मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यापरीक्षांचे निकाल लवकर लावण्याबाबत निर्णय घेण्यात असून,१५ हजार ५१५ रिक्त पदे आयोगामार्फतभरायला वित्त विभागानं मान्यता दिली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनीसांगितलं, की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत कोविड परिस्थितीत राज्यनिवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं निर्देशित केलं आहे.राज्य सरकार त्यांनाया निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करेल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूरच्या अधिवेशनात यावरअंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
दरम्यान काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यासह अन्य लोकांचे फोन २०१७ -१८ साली टॅप करण्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची घोषणा गृहमंत्रीदिलीप वळसे पाटील यांची आज विधानसभेत केली. हा मुद्दा पाटोले आणि इतरांनी उपस्थित केला होता. कालच्या शिवीगाळ प्रकरणानंतर पीठासन अधिकारी भास्कर जाधव यांना येत असलेल्या धमक्याबाबत त्यांना योग्य तेसंरक्षण देण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.जाधव यांच्या धमकीप्रकरणावर अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.