मुंबई : कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक सजग व सचेत राहण्याची गरज आहे. असे सांगतानाच कोरोना योद्ध्यांनी यानंतर कोरोनाबाबत जनजागृतीचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

परानुभूती व द हिंदू फाऊंडेशन यांच्या वतीने राजभवन, मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते २१ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

परानुभूती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ.भुषण जाधव व द हिंदू फाऊंडेशनचे संदिप गुप्ता व्यासपिठावर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी भारत राजपूत, माडी रेड्डी कोंडा रेड्डी, अमरनाथ नरहरी कोरडे, विक्रमसिंह भोसले, अजय देशमुख, शुभम नागपुरे, आर. सी. शाह, अजय गुजराथी, वैदयुला नरेंद्र रेड्डी, अलोक मेहता, धनराज सिंह पुरी, जमिल सैदी, विनय पुरुषोत्तम भांगे, डॉ.लोरहो फिझे, प्राजक्ता, अनिल जैन, रुद्र प्रसाद बिसवास, बी. बी. जाधव, मिरा जाधव, गुरुपाल सेठी आणि जिग्नेश हिराणी या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.