मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यानं जास्त आहे. मिळालेल्या तक्रारींपैकी ३४३ ठिकाणचे खड्डे बुझवले असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं कळवलं आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुझवण्यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. यांपैकी प्रत्येकी दीड कोटींचा निधी वितरित केला आहे, तर छोटे खड्डे बुझवण्यासाठी एकूण ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही पालिकेनं कळवलं आहे.