मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईची जीवन वाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक १४ महिन्यांच्या खंडानंतर सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी कालपासून सुरू झाली. कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्यानं मुंबईकरांची मोठी सुविधा झाली आहे. सकाळी गर्दी थोडी कमी होती, मात्र दुपार नंतर गर्दी वाढायला लागली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लोकल बंद झाल्या होत्या. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केवळ मर्यादित स्वरूपात लोकल वाहातूक सुरु झाली होती. जवळपास दीड वर्षाच्या खंडा नंतर पुन्हा रेल्वेचा प्रवास करायला मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.