PRAYAGRAJ, AUG 3 (UNI):- A beneficiary receives a dose of COVID-19 vaccine, during a mega vaccination drive amidst the spread of the coronavirus disease (COVID-19), at Motilal Nehru Medical Collage in Prayagraj on Tuesday. UNI PHOTO-12U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५६ कोटी ६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ३७ हजार १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी १४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३५ हजार १७८ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात सुमारे ३ लाख ६७ हजार रुग्ण उपाचाराधीन आहेत.