मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ५ हजार ४२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख १ हजार २१३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख १ हजार १६८ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३५ हजार २५५ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ६१ हजार ३०६ ॲक्टिव रुग्ण आहेत.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे.

सांगली जिल्ह्यात काल ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ५८० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ५ हजार ४८६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल या आजारामुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात काल २८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात १४७ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २१५ रुग्ण दगावले आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल बरे झालेल्या एका रुग्णाला घरी पाठवलं. काल एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात १६ रुग्ण उपचार घेत आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल ३ रूग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात एक बाधित रुग्ण आढळला. सध्या ५० रुग्ण उपचाराधीन आहेत.

सिंधुदुर्गात काल रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. काल जिल्ह्यात ४४ रुग्णांना कोरोना ची लागण झाली.जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९६९ वर पोचली आहे. काल एक रुग्ण दगावला.

जालना जिल्ह्यात काल २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ६ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या जिल्ह्यात ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.