पुणे (वृत्तसंस्था) : आझादी का अमृतमहोत्सातंर्गत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारताची मौलिक एकता या विषयावर केरळ चे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान विदयापीठात आयोजित करण्यात आले होते. यावेळी कुलगुरु नितीन कळमळकर उपस्थित होते.भारतात विविधते मध्ये एकता असुन स्वताकरता जीवन जगण्याकरता समाजातील वंचिता करता आपले आयुष्य समर्पित करण्याची शिकवण भारताच्या सांस्कृतितेने दिली आहे. यातुन सशक्त भारत घडण्यास मदत होणार आहे. असही राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी यावेळी सांगितले.