नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक ५९ कोटी ५५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत काल ६१ लाख ९० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के आहे.  काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३७ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. काल ६४८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३५ हजार ७५८ झाली आहे. सध्या देशभरात ३ लाख २२ हजार ३२७  रुग्ण उपचाराधीन आहेत.