मुंबई : राज्याच्या विधानपरिषदेवर औरंगाबाद तथा जालना स्थानिक प्राधिकरणाद्वारे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला असून त्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार ॲड.अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार अब्दुल सत्तार, श्री. दानवे यांचे कुटुंबीय यांच्यासह विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.