मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा पडू नये, खत आणि बियाणे विक्री केंद्रावर गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या. सोलापूरमध्ये आढावा बैठकीत ते बोलत होते. सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, त्याचप्रमाणे मराठी भाषा या विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या. जिल्ह्यातल्या शिवभोजन थाळी केंद्रांची तपासणी करावी, प्रलंबित जातपडताळणीची प्रकरणं निकाली काढावी अशा सूचनाही डॉ. कदम यांनी दिल्या.