नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे आजपासून आझादी का अमृत महोत्सवाचा सप्ताह साजरा करणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे. वाणिज्य विभागातर्फे वाणिज्य सप्ताह आजपासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतासाठी नव्यानं  उदयाला येत असलेली भारताची  अर्थव्यवस्था आणि हरित आणि स्वच्छ  भारत अशा विषयांवर भर दिला जाणार आहे. सहकार्य-विषयक सत्रातून ७३९ जिल्ह्यांमध्ये  कृषीमालाला शेतापासून विदेशापर्यंत चालना मिळण्यासाठी आणि वाणिज्य उत्सवातून निर्यातदारांना प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने वाणिज्य उत्सव अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.