नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा २०२१-२२ साठी खरीप हंगामातल्या शेती उत्पादनाचा पहिला अंदाज कृषीमंत्री तोमर यांनी काल जाहीर केला. त्यानुसार खरिप हंगामासाठी विक्रमी १५० दशलक्ष टनांहून अधिक धान्य उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा ते सुमारे १२ दशलक्ष टनांहून जास्त असेल. शेतकऱ्यांचे कष्ट, वैज्ञानिकांचं कौशल्य सरकारची शेतीविषयक धोरणं यामुळंच हे शक्य झाल्याचं तोमर म्हणाले.