पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षापासुन ‘महापौर चषक स्कुलोत्सव’ स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने “स्कुलोत्सव” ही स्पर्धा घेण्याचा मुख्य उद्देश हा असेल की शहरातील सर्व पालिकेच्या व खाजगी शाळेतील सर्व खेळाडु यामध्ये सहभागी होऊ शकतील. आपल्या शहराच्या महापौर चषक स्पर्धेचा लाभ हा याच शहरातील खेळाडुंना मिळावा या दृष्टीने मनपाच्या शाळेतील विद्यार्थांना चांगल्या क्रीडा शिक्षकांची गरज आहे, पण त्या दृष्टीने ते शिक्षक उपलब्ध नसल्याकारणाने ती मुले आपली गुणवत्ता दाखवु शकत नाहीत, तरी ‘२३ ऑगस्ट २०१९’ रोजीच्या ‘महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग’ यांच्या निर्णयानुसार क्रीडा मार्गदर्शकांची मानधनावर नेमणुक केली आहे. त्याचीही प्रत मी सोबत जोडत आहे व आपल्या पालिकेचे एकुण १८ क्रीडा शिक्षक हे गेल्या काही वर्षापासुन निवडणुक विभागात कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना पालिकेतुन पदमुक्त करुन त्यांना निवडणुक विभागाकडे पाठवावे त्या सर्व शिक्षकांचीही प्रत मी सोबत जोडत आहे, व ‘PCMC Teen-20 स्कुलोत्सव’ च्या दृष्टीने लवकरात लवकर आपण मानधनावर क्रीडाशिक्षकांची नेमणुक करावी जेणेकरून पालिकेच्या शाळेतील खेळाडुंना त्याचा लाभ घेता येईल व पालिकेच्या शाळांमध्येही उत्कृष्ट खेळाडु घडतील. उपरोक्त विषयानुरुप सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी निवेदननाद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.