नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ८६ कोटींचा टप्पा ओलांडला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की गेल्या २४ तासात लशीच्या ३८ लाख १८ हजार पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात २९ हजार ६२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ७८ शतांश टक्के झाला आहे. देशभरात काल कोविडचे २६ हजार ४१ नवे रुग्ण आढळले असून सध्या बाधासक्रीय रुग्णांची संख्या २ लाख ९९ हजार असून ती एकंदर नोंद झालेल्या रुग्णसंख्येच्या एक टक्क्याहून कमी आहे. कोविड चाचण्यांची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत ५६ कोटी ४४ लाख नमुन्यांची तपासणी झाली आहे.