नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी लागू नसेल. असं परिपत्रकात म्हटलं आहे. ही परवानगी प्रत्येक प्रकरणातली परिस्थिती तपासून त्यानुसारच दिली जाईल असं महासंचालनालयाने म्हटलं आहे. कोविड महामरीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 23 मार्चला आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी लावण्यात आली. त्यानंतर अनेक देशात सरकारने वंदे भारत उड्डाण सेवा चालवली. तसंच काही देशांबरोबरच्या समझोत्यानुसार निर्बंध कमी करण्यात आले होते.