SRINAGAR, SEP 21 (UNI) A paramedical staffer immunizes a civilian in capital city of Lal Chowk in Srinagar during a drive intensified by the authorities to control COVID-19 coronavirus infection in the Kashmir valley on Tuesday. UNI PHOTO SRN -4.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेतल्या देशातल्या कामगिरीबद्दल  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ७० टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महामारी विरोधीतल्या लढाईत भारत नवनवे उच्चांक नोंदवत आहे, असं ट्विट मांडविय यांनी केलं आहे. देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख २१ हजार २४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल  २० हजारापेक्षा जास्त  नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात २ लाख ६४ हजार ४५८ एक्टीव्ह रुग्ण त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल १८० रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ४८ हजार ९९७ वर पोचली आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत काल २३ लाख ४६ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत या लशींच्या ९० कोटी ७९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.