नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला जात आहे. सिंधुदुर्ग डाक विभागात उद्या “जागतिक टपाल दिन साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. सिंधुदुर्गचे डाकघर अधीक्षक आ ब कोड्डा यांनी  ही माहिती दिली. या सप्ताहाच्या अनुषंगान डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी तसंच बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार डाक विभागातर्फे केला जातो, असं कोड्डा यांनी सांगितलं.