नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २ ते १८ वर्ष वयोगटातल्या  मुलांसाठी  कोवॉक्सीन लस वापरायला डीसीजीआयनं मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकनं ही लस तयार केली आहे.यामुळे देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाना आणखी बळ मिळणार आहे.